शार्पची नवीन प्रिंटर मालिका
शार्प बिझनेस सिस्टम्सने बीपी- ७०सी व बीपी ५० सी या नवीन कलर लेझर मल्टीफंक्शन प्रिंटरची मालिका सादर केली आहे. या मल्टीफंक्शन प्रिंटर मालिकेमध्ये १२०० डीपीआय रिझोल्युशन, स्कॅनिंगसाठी प्रगत एआय क्षमता, १०.१ इंचाचे कॅपेसिटिव्ह टच पॅनेल, प्रगत यूआय प्रणाली आदी सुविधा या प्रिंटरच्या मालिकेत आहेत. जोडीला हायस्पीड कॉपी, प्रिंटिंग आणि स्कॅनिंग, ए ३ आकारापर्यंत पेपर इनपुट या सुविधा ही या प्रिंटरच्या मालिकेमध्ये आहेत. मोठ्या कंपन्या, शैक्षणिक संस्था, सल्लागार कंपन्या, प्रकाशन संस्था, रुग्णालये, स्टॉक एक्सचेंज, ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्यासाठी ही प्रिंटर मालिका उपयुक्त ठरणार आहे.

Comments
Post a Comment