तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त

 तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त


दिफू आसामच्या कार्बी आंगलाँग जिल्ह्यात अमली पदार्थासह एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आसाम पोलीस आणि सीआरपीएफच्या चमूने बोकाजान भागात ही कारवाई केली. शेजारच्या नागालँडच्या दिमापूरमधून येणाऱ्या एका वाहनाला रोखत त्याची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीतून १ किलो मार्फिनसह चालकाला अटक करण्यात आली.

Comments