अमेरिकेतील विद्यापीठात गोळीबार

 अमेरिकेतील विद्यापीठात गोळीबार


ईस्ट लांसिंग : अमेरिकेतील मिशीगन स्टेट विद्यापीठात सोमवारी रात्री उशिरा एका बंदूकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. हल्लेखोराने नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विद्यापीठात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यामागील कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. तसेच हल्लेखोर विद्यापीठाशी संबंधित होता का, याबाबतदेखील स्पष्ट माहिती पोलिसांनी दिली नाही; पण हल्लेखोर एक कृष्णवर्णीय असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

Comments